टँकर पलटी होऊन पेट्रोलची गळती

Foto

वैजापूर:  मनमाड मार्गे औरंगाबादकडे येणारा पेट्रोल टँकर हा पलटी झाल्याने पेट्रोल व डिझेलची गळती झाली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री तालुक्यातील तलवाडा गावाजवळ घडली. यात ड्रायव्हर हा किरकोळ जखमी झाला आहे.
याविषयी मिळालेली माहिती अशी की, औरंगाबादकडे येत असलेला टँकर (एमएच 20 एटी 7999) हा रात्री दिड वाजेच्या सुमारास पलटी झाला. या टँकरमध्ये दहा हजार लिटर पेट्रोल व डिजेल होते. पलटी झाल्याने यातून काही प्रमाणात इंधन गळती झाली. या अपघातात टँकरचा ड्राव्हर   हा किरकोळ जखमी झाला आहे.